ठाण्यात बोगस कॉल सेंटरवर पोलीसांची कारवाई

ठाण्यात बोगस कॉल  सेंटरवर पोलीसांची कारवाई

ठाण्यातून परदेशी अमेरिकन नागरिकांना शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करून जबरी लूट करणाऱ्या ११ जणांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. वागळे इस्टेट येथे किसन नगर भागात बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला उपलब्ध झाली, त्यानुसार छापा मारून ही कारवाई करण्यात आली आहे.

त्यांच्यावर श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकाने कॉलसेंटरमधून ३ लाख २५ हजाराचा लॅपटॉप, हार्ड डिस्क, मोबाईल फोन, मॉडेम, रोख रक्कम, असा मुद्देमाल जप्त केला. अटक ११ आरोपीना न्यायालयात नेले असता त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

ठाणे पोलीस आयुक्तालयाचे सहआयुक्त दत्तात्रय कराळे याना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सनराईस बिजनेस पार्क, रोड नं. १६, किसननगर वागळे इस्टेट ठाणे या ठिकाणी छापा टाकुन बोगस कॉलसेंटरचा फर्दाफ़ाश केला. या बोगस कॉलसेंटर प्रकरणी पोलीस पथकाने आरोपी हैदरअली आयुब मन्सुरी, भाविन रविंद्र शहा, तुषार परमार, रायलन आरमानु कार्लोस यांच्यासह अन्य ७ आरोपी असे ११ आरोपीना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपींना २६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in