घरफोडी करणारा गजाआड; १,१०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी सपोनि सानप, पोहवा वाघ, पोहवा सरनाईक, पो.ना. कोती पोअं पोटे, पोअ सांगळे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला.
घरफोडी करणारा गजाआड; १,१०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

डोंबिवली : घरफोडी करून पळून जाणाऱ्या आरोपीला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले आहे. अटक आरोपींकडून १,१०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश सोनु केदारे (१९) असे अटक आरोपीचे नाव आहे. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आयरेगाव, रूम नं. ७२, ज्योतीनगर झोपडपट्टी, पाण्याच्या टाकीजवळ, डोंबिवली पूर्व येथे फिर्यादी यांच्या राहत्या घरात आकाशने प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा १,१०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.

या प्रकरणी सपोनि सानप, पोहवा वाघ, पोहवा सरनाईक, पो.ना. कोती पोअं पोटे, पोअ सांगळे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. आकाश हा ज्योतीनगर, आयरेगाव डोंबिवली पूर्व येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने आकाशचा आयरेगावमधील ज्योतीनगर झोपडपट्टी पाण्याच्या टाकीजवळ पाठलाग करून अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in