लाचप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकास अटक

कोनगाव पोलिीस ठाणे हद्दीतील एका गुन्ह्यातील आरोपीचे नाव वगळण्यासाठी कोनगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाने आरोपीकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे समोर आले आहे.
लाचप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकास अटक
Published on

भिवंडी : कोनगाव पोलिीस ठाणे हद्दीतील एका गुन्ह्यातील आरोपीचे नाव वगळण्यासाठी कोनगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाने आरोपीकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधिकाऱ्यास सापळा रचून रंगेहाथ पकडले.

राजेश केशवराव डोंगरे (३४) असे लाचप्रकरणी अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका दाखल गुन्ह्यातील आरोपीचे नाव वगळण्यासाठी पोउनि राजेश डोंगरे यांनी आरोपीकडून प्रथम ८० हजार रुपयांची लाच स्वरूपात मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, याची तक्रार आरोपीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० फेब्रुवारी रोजी केली होती. त्यानुषंगाने संबंधित विभागाने वरिष्ठांच्या आदेशानुसार २२ फेब्रुवारी रोजी कारवाई केली असता डोंगरे यांना पडताळणी वेळी १० हजार रुपये लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष रंगेहाथ पकडले असून त्यांना ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दरम्यान पोउनि डोंगरे यांना रविवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in