दहीहंडी उत्सवाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची प्रताप सरनाईकांची मागणी

या उत्सवात बाळ- गोपाळांपासून ते थोरा-मोठ्यापर्यंत तसेच महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
दहीहंडी उत्सवाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची प्रताप सरनाईकांची मागणी
Published on

मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग असलेला दहीहंडी हा उत्सव राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवात बाळ- गोपाळांपासून ते थोरा-मोठ्यापर्यंत तसेच महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.

मुंबई, ठाणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातील इतर छोट्या-छोट्या शहरामध्येही या उत्सवाला स्पर्धेचे रूप प्राप्त झाल्याने मोठ्या उत्साहात सण साजरा होऊ लागला आहे. महाराष्ट्राबरोबरच देश-विदेशातही हा उत्सव लोकप्रिय होऊ लागला आहे. स्पेन सारख्या देशामधून महाराष्ट्रात दहीहंडीमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धक येत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे दहिहंडी उत्सव जल्लोषात साजरा होऊ शकला नाही.

परंतू, या वर्षी उत्सव साजरा करण्यासाठी तरूणांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर तरूण-तरूणींचा सहभाग असलेला हा उत्सव राष्ट्रीय सण म्हणून जाहिर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देणे गरजेचे आहे.

आमदार या नात्याने गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत असून गोपाळकाल्याच्या दिवशी जिल्हाधिकार्यांना असलेल्या अधिकारानुसार फक्त मुंबई व ठाणे विभागाला सुट्टी जाहिर करत असतात परंतू, शासन स्तरावर अद्यापपर्यंत याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला गेलेला नाही.

त्यामुळे यावर्षी येणारा गोपाळकाला उत्सव १९ ऑगस्ट रोजी साजरा होणार असून शासन स्तरावर राष्ट्रीय सण म्हणून जाहिर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केल्याचे आ. सरनाईक यांनी सांगितल

logo
marathi.freepressjournal.in