जीपी पारसिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी, विक्रम गोपीनाथ पाटील यांची बिनविरोध निवड

बँकेच्या महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटक येथे एकूण ९१ शाखा ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.
जीपी पारसिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी, 
विक्रम गोपीनाथ पाटील यांची बिनविरोध निवड
Published on

ठाणे : देशातील मोठ्या सहकारी बँकांमध्ये सर्वोत्तम असलेल्या जीपी पारसिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विक्रम गोपीनाथ पाटील व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीच्या अध्यक्षपदी केसरीनाथ बापू घरत यांची बिनविरोध निवड झाली.

बँकेचे संस्थापक अध्यक्ष गोपीनाथजी (दादासाहेब) पाटील यांनी आखून दिलेल्या निस्पृह जनसेवा सचोटी व पारदर्शकता या मार्गावरून बँकेने केलेली निरंतर वाटचाल स्पृहणीय (उल्लेखनीय) आहे. जीपी पारसिक बँकेचे मावळते अध्यक्ष नारायण गावंड यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रम गोपीनाथ पाटील व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमीटीचे अध्यक्ष केसरीनाथ बापू घरत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते. २४ एप्रिल १९७२ रोजी नोंदणी झालेल्या जीपी पारसिक सहकारी बँकेला ३० जानेवारी १९९८ रोजी शेड्युल्ड दर्जा आणि मार्च २०१५ मध्ये मल्टी स्टेट बँकेचा दर्जा प्राप्त झाला. बँकींग क्षेत्रामध्ये पारसिक बँकेचे नाव अग्रेसर आहे. सध्या बँकेच्या महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटक येथे एकूण ९१ शाखा ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. बँकेच्या एकूण ठेवी रु. ४,३९५ कोटी व कर्ज रु. २,०४७ कोटी असून एकूण व्यवसाय रु. ६,४४३ कोटी इतका आहे.

logo
marathi.freepressjournal.in