अश्वजीतच्या जामिनाला प्रिया सिंह उच्च न्यायालयात आव्हान देणार

या प्रकरणात पोलिसांवरती राजकीय दबाव होता. ज्यावेळेला प्रिया सिंहचा पोलिसांनी जबाब नोंदवला त्यावेळेला ती पूर्णपणे शुद्धीवर नव्हती
अश्वजीतच्या जामिनाला प्रिया सिंह उच्च न्यायालयात आव्हान देणार
PM

ठाणे : प्रिया सिंह मारहाण प्रकरणात अश्वजीत गायकवाड याच्यासह रोमिल पाटील आणि सागर शेडगे या दोघांना ठाणे न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे. पोलीस तपास कामात सहकार्य करणे तसेच फिर्यादी आणि साक्षीदार याच्यावर कोणताही दबाव टाकू नये, अशी अट जामीन देताना टाकली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय प्रिया सिंह यांचे वकील ॲॅड. बाबा शेख यांनी सांगितले आहे.

अश्वजीत गायकवाड याने प्रेयसी प्रिया सिंह हिला केलेली मारहाण आणि अंगावर गाडी घातल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी आरोपी अश्वजीत गायकवाड याच्यासह त्याचे साथीदार रोमन पाटील आणि सागर शेडगे यांना रविवारी अटक केली होती. या गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ आणि लँड रोव्हर डिफेंडर गाडी  तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ठाणे पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या अधिपत्याखाली स्थापन केलेल्या एसआयटीने तिघांना अटक केली. त्यांना सोमवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर गायकवाड यांच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केल्यानंतर अश्वजीत गायकवाड याच्यासह त्याचे दोन साथीदार रोमिल पाटील आणि सागर शेडगे या दोघांना जामीन मिळाला.

दरम्यान, प्रिया सिंह यांचे वकील बाबा शेख यांनी पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांवरती राजकीय दबाव होता. ज्यावेळेला प्रिया सिंहचा पोलिसांनी जबाब नोंदवला त्यावेळेला ती पूर्णपणे शुद्धीवर नव्हती. तरीही तिचा जबाब नोंदवण्यात आला.

प्रिया सिंहने पोलिसांकडे ३०७ चा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली, मात्र पोलिसांनी तो गुन्हा दाखल केलेला नसल्याचा आरोप ॲॅड. बाबा शेख यांनी केला आहे. अश्वजीतला जामीन मिळाल्याने प्रिया सिंहच्या वकिलांकडून ३०७ आणि ३७६ चे कलम दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in