मुलीची हत्या करून विवाहितेची आत्महत्या

घणसोलीतील चिंचआळीत राहणाऱ्या एका विवाहितेने आपल्या ६ वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
मुलीची हत्या करून विवाहितेची आत्महत्या
Published on

नवी मुंबई : घणसोलीतील चिंचआळीत राहणाऱ्या एका विवाहितेने आपल्या ६ वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आजारपणातून आलेल्या नैराश्यातून या विवाहितेने हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

या घटनेतील मृत विवाहितेचे नाव प्रियंका महादेव कांबळे (२५) असे असून तिच्या मुलीचे नाव वैष्णवी कांबळे (६) असे आहे. प्रियंका, पती महादेव कांबळे व मुलगी वैष्णवी यांच्यासोबत घणसोली गावातील चिंचआळीतील महाशेरावाली अपार्टमेंटमध्ये राहत होती. प्रियंकाचा पती कपड्याच्या दुकानात कामाला असल्याने बुधवारी रात्री उशिरापर्यंत तो दुकानावर होता. घरामध्ये मुलीसह असलेल्या प्रियंकाने मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिने देखील ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कांबळे यांच्या घराची खिडकी उघडी असल्याने शेजाऱ्यांना प्रियंका कांबळे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली.

logo
marathi.freepressjournal.in