उल्हासनगरमधील डिस्प्ले बोर्डवर अचानक Porn Video; पोलिसांकडून तपास सुरू

गेल्या वर्षी मार्च महिन्यात पामबीच रोडवरील वेगमर्यादेच्या डिस्प्ले बोर्डवर हिंदी भाषेत अपशब्द झळकले होते. याशिवाय 2022 मध्ये हाजी अली-लोटस जंक्शनजवळ एका डिजिटल माहिती फलकावर 'दररोज गांजा फुका' असा आणि...
उल्हासनगरमधील डिस्प्ले बोर्डवर अचानक Porn Video; पोलिसांकडून तपास सुरू
प्रातिनिधिक छायाचित्र

बिहारच्या पाटणा रेल्वे स्थानकावर असलेल्या एलईडी टीव्ही क्रिनवर अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार मध्यंतरी घडला होता. आता ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधूनही असाच प्रकार समोर आला आहे. उल्हासनगर महापालिकेने पर्यावरण विषयक माहिती देण्यासाठी सपना गार्डन येथे लावलेल्या एलईडी टीव्ही क्रिनवर २३ जानेवारी रोजी रात्री चक्क पॉर्न व्हिडिओ सुरू झाला आणि खळबळ उडाली. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

सपना गार्डन येथील एलईडी टीव्हीवर २३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ब्ल्यू फिल्म सुरू झाली. अश्लिल चित्रफित सुरू होताच महिला व मुलींनी तेथून काढता पाय घेतला. तर नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर स्थानिक नगरसेवकाला याबाबत माहिती देण्यात आल्यावर, त्यांनी महापालिका अधिकाऱ्याला माहिती देताच एलईडी टीव्ही बंद करण्यात आला.

उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार उल्हासनगर महानगरपालिकेचा पर्यावरण विभागाचा अधिकारी आहे. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम कलम ६६ (संगणकाशी संबंधित गुन्हे) आणि ६७ अ (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्री प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. LED बोर्डच्या संगणक प्रणालीमध्ये छेडछाड करून कोणीतरी क्लिप सुरू केल्याचा पोलिसांना संशय आहे. डिस्प्ले बोर्डच्या तांत्रिक बाबी पाहणाऱ्या खासगी कंपनीकडेही पोलिस चौकशी करणार आहेत.

अशा घटनांमध्ये वाढ -

मुंबई आणि नवी मुंबईतही अशा घटना घडल्या आहेत, पण या प्रकरणांमध्ये पोलिसांना अद्याप कोणतेही यश मिळालेले नाही. गेल्या वर्षी मार्च महिन्यात पामबीच रोडवरील नेरुळ मार्गावरील वेगमर्यादेच्या डिस्प्ले बोर्डवर हिंदीभाषेत अपशब्द झळकण्यास सुरुवात झाली होती. डिसेंबर 2022 मध्ये हाजी अली-लोटस जंक्शनजवळ एका डिजिटल माहिती फलकावर 'दररोज गांजा फुका' असा संदेश झळकला होता. तर, त्याच महिन्यात दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओबेरॉय मॉलजवळील ट्रॅफिक अॅडव्हायझरी डिस्प्ले बोर्डवरही आक्षेपार्ह मेसेज झळकला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in