भिवंडीत १२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

शहरातील खंडूपाडा येथील बाबा हॉटेलजवळ प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करताना शांतीनगर पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेऊन अटक केली आहे.
भिवंडीत १२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
Published on

भिवंडी : शहरातील खंडूपाडा येथील बाबा हॉटेलजवळ प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करताना शांतीनगर पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्याकडून १२ लाख ४५ हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान त्याच्या अन्य चार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जानेवारी रोजी वंजार पट्टी परिसरातील खंडूपाड्यातून मानवी शरीरास विघातक सुगंधित प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली होती, त्यानुषंगाने पोलिसांनी खंडूपाडा परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी संशयित ट्रक पोलिसांना निदर्शनास आला.

दरम्यान ट्रकची झाडाझडती घेतली असता, ट्रकमध्ये प्रतिबंधित विमल केसरयुक्त पानमसाला व व्ही १ सुगंधी तंबाखूची वाहतूक करताना आढळल्याने पोलिसांनी गुटखा जप्त करीत ट्रकचालक मोहम्मद अली अंसिर खान (३४) याच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर पोलिसांची कुणकुण लागताच मोहम्मदचे अन्य ४ साथीदार रियाज शेख, लाला भाई उर्फ जावेद, राजकुमार सपाटे, गुलजार अहमद शेख हे फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास सपोनि अरुण घोलप करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in