आयकर खात्यातील शिपाई कम प्रोड्युसरकडून वेश्याव्यवसाय,रोल देतो सांगून तरुणींना लावले वेश्याव्यवसायास

चित्रपट, मालिका आदींमध्ये काम देतो, सांगून इच्छुक तरुणींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या आयकर खात्यातील शिपाई तसेच प्रोड्युसर असलेल्या आरोपीला त्याच्या साथीदारासह भाईंदर पूर्व भागातून पोलिसांनी अटक केली आहे.
आयकर खात्यातील शिपाई कम प्रोड्युसरकडून वेश्याव्यवसाय,रोल देतो सांगून तरुणींना लावले वेश्याव्यवसायास

भाईंंदर : चित्रपट, मालिका आदींमध्ये काम देतो, सांगून इच्छुक तरुणींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या आयकर खात्यातील शिपाई तसेच प्रोड्युसर असलेल्या आरोपीला त्याच्या साथीदारासह भाईंदर पूर्व भागातून पोलिसांनी अटक केली आहे. वेश्याव्यवसायसाठी आणलेल्या ४ तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेस माहिती मिळाली की, मढ-मार्वे, मलाड व भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावर राहणारा सोलोमन नारकांथोल्लु (५५) हा निर्माता व त्याचा नातलग साथीदार चंद्राराज उर्फ मायकल मुत्तीपोग (२२) हे दोघे वेश्या व्यवसाय चालवतात.

सोलोमन याच्याशी बनवतग गिऱ्हाईकामार्फत संपर्क साधून खात्री केली. सुलेमान याने आपण वेब सिरीज, फोटोशुट व युट्युबमध्ये साईड हिरोईन म्हणून काम करणाऱ्या मुली वेश्यागमनासाठी आहे. गिऱ्हाईकास त्याच्या सोयीनुसार लॉज बुक करायला लावून साइड हिरोईन तरुणी वेश्यागमनासाठी ४० हजार रुपयांच्या मोबदल्यात पाठवतो असे सांगितले. आपण मीरा-भाईंदर, गोराई-मुंबई, ठाणे, लोणावळा, दमण आदी भागातील लॉजमध्ये गिन्हाईकास तरुणी पुरवत असल्याचे त्याने सांगितले.

माहितीची खात्री पटल्यावर बनावट गिऱ्हाईकामार्फत सोलोमनसोबत सौदा नक्की केला. पोलिसांकडून सापळा रचण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी तो चंद्राराजसह ४ तरुणींना घेऊन इंद्रलोक मार्गावरील एका हॉटेलजवळ आला. त्याने पैसे स्वीकारताच पोलिसांनी सोलोमन व चंद्रराज या दोघांना पकडले. शनिवारी दोघांवर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

बक्कळ पैसा कमवला

सोलोमन हा मुंबईतील आयकर विभागात शिपाई म्हणून नोकरीला आहे. गेल्या १५ वर्षांपासून तो सिने-मालिका क्षेत्रात साईड हिरो म्हणून काम करतोय. या शिवाय त्याने अब होगी हमारी हुकूमत व कहा तक भागेगी हे चित्रपट निर्माता म्हणून केले आहेत. मुंबईत त्याची दोन कार्यालये आहे. सामान्य कुटुंबातील व कमी शिकलेल्या तरुणींना हेरून त्यांना चित्रपट-मालिकांमध्ये काम देतो, सांगून तो त्यांना वेश्याव्यवसायास लावून बक्कळ पैसे कमवत होता.

logo
marathi.freepressjournal.in