महिला वेटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५२ जणांविरोधात गुन्हा दाखल

वाशी सेक्टर १९ येथील आरजी आकांक्षा एंटरप्राइझेस करिष्मा बार अँड रेस्टॉरंट येथे महिला वेटरच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली.
महिला वेटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५२ जणांविरोधात गुन्हा दाखल
प्रातिनिधिक फोटो

नवी मुंबई : वाशी सेक्टर १९ येथील आरजी आकांक्षा एंटरप्राइझेस करिष्मा बार अँड रेस्टॉरंट येथे महिला वेटरच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. याप्रकरणी ५२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर १९ येथे आरजी आकांक्षा एंटरप्राइझेस करिष्मा बार अँड रेस्टॉरंट नावाचा बार आहे. या ठिकाणी ग्राहकांना सेवा देण्यासाठी महिला कामगार (वेटर) आहेत.

मात्र त्या हॉटेलसंदर्भात ग्राहकांना सेवा न देता अंगविक्षेप करून ग्राहकांशी बिभत्स हावभाव व अश्लील चाळे करत असल्याची माहिती मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. सदर माहितीची शहानिशा करून बारवर सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजता धाड टाकण्यात आली. त्यावेळी रेणुका सिसोदिया, पलक करवल, शिवानी ठाकूर संयोगिता कर्मावर यांच्यासह ४८ असे एकूण ५२ जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in