शिवसेना आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या विरोधात निदर्शने

अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी होर्डिंग आणि पोस्टर लावले आहेत.
शिवसेना आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या विरोधात निदर्शने

अंबरनाथचे बंडखोर शिवसेना आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या विरोधात अंबरनाथ शहरात बॅनरबाजी करण्यात आली असून त्यांच्या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत.

मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर हे एकनाथ शिंदे गटात सामील झालेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी होर्डिंग आणि पोस्टर लावले आहेत. "हो मी गद्दार आहे "अशा आशयाचा मजकूर या होर्डिंग आणि पोस्टरवर लिहिण्यात आला आहे.

काल रात्री अचानकपणे शहराच्या विविध ठिकाणी हे होर्डिंग आणि पोस्टर लावण्यात आले, पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पोलिसांना हे पोस्टर दिसले ते पोलिसांनी काढून टाकले. मात्र अजूनही शहरातील काही भागात आमदार किणीकर यांच्या विरोधातले हे पोस्टर तसेच आहेत. दोन दिवसापूर्वी डॉ. किणीकर यांच्या समर्थनार्थ बॅनर लागले होते आणि आता विरोधात.

राज्यातील सगळा राजकीय तणाव पाहता अंबरनाथ शहरात देखील शिवसैनिक आणि बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये बॅनर युद्ध सुरू झाल्याचा पाहायला मिळत आहे. हे युद्ध आणखी विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदार संघात असलेल्या उल्हासनगर -५ येथील दूधनाका चौक या ठिकाणी ठाकरे समर्थक राजू दुर्गे, अशोक दवणे, राजू वाळुंज, शिरपत मोरे, जितू साळुंखे, गुलाब भालेराव, मिलिंद भोईर यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आणि बंडखोर शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर व एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in