ठाण्यातील काॅग्रेस कार्यकर्त्यांचे केंद्र सरकार विरोधात निदर्शने

विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते
 ठाण्यातील काॅग्रेस कार्यकर्त्यांचे केंद्र सरकार विरोधात निदर्शने
Published on

देशात वाढत असलेली प्रचंड महागाई, बेरोजगारी, इंधन तेल यातील प्रचंड दरवाढ, ढासळलेली अर्थव्यवस्था, अग्निपथ योजनेद्वारे तरुणांचे खच्चीकरण, गब्बरसिंग टॅक्स या बाबीचा निषेध करण्यासाठी केंद्रातील भा.ज.प. सरकारच्या विरोधात अखील भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात जनआंदोलन पुकारले असून ठाण्यातील काॅग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहाबाहेर निदर्शने केली.

ठाणे शहर काॅग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी सागितले की, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, त्याचबरोबर आता शैक्षणिक साहित्यावरही जीसटी लावून केंद्रातील सरकारने शिक्षणही महाग केले आहे.

मोदी सरकारची विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याची भूमिकेत दिसत आहे, पण मोदीचा खरा चेहरा आता समोर आला आहे, असे बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in