ठाण्यात ३४०६ वाहनांची खरेदी; गुढीपाडव्यानिमित्त सर्वाधिक २३१३ दुचाकी, ७४९ चारचाकीचा समावेश

गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा या शुभमुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची रेलचेल असते. विशेषतः गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन, वस्तू खरेदी शुभ मानली जाते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी नागरिक काही दिवसांपूर्वीच आगाऊ बुकिंग करतात.
 ठाण्यात ३४०६ वाहनांची खरेदी; गुढीपाडव्यानिमित्त सर्वाधिक २३१३ दुचाकी, ७४९ चारचाकीचा समावेश

ठाणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाण्यात मंगळवारी १०५ वाहनांची खरेदी झाली. यामध्ये ८४ दुचाकी, तर २१ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. १ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत ३ हजार ४०६ वाहनांची खरेदी झाली असून, यामध्ये सर्वाधिक २ हजार ३१३ दुचाकींचा समावेश असल्याची माहिती ठाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.

गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा या शुभमुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची रेलचेल असते. विशेषतः गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन, वस्तू खरेदी शुभ मानली जाते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी नागरिक काही दिवसांपूर्वीच आगाऊ बुकिंग करतात. त्यामुळे १ ते ९ एप्रिल या कालावधीत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३ हजार ४०६ नवीन वाहनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २ हजार ३१३ दुचाकी तर, ७९४ कारची संख्या आहे.

आठ दिवसांपासून वाहन खरेदीची तयारी

मंगळवारी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत अनेक जण मनोभावे आपल्या वाहनाची पूजा करून वाहन घरी नेताना दिसले. नवीन खरेदी केलेल्या वाहनासोबतचा फोटोसुद्धा अनेकांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर टाकल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. अनेकांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच आपले वाहन घरी नेले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाणेकरांनी गेल्या आठ दिवसांपासून वाहन खरेदी करण्याची तयारी केली होती. ही सर्व वाहने ठाणेकर मंगळवारी आपापल्या घरी नेण्याच्या तयारीत असणार, हे जाणून ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आणि कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी वर्गाकडून विशेष परिश्रम घेण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in