देहविक्री व्यापार चालविणाऱ्या कव्वाली गायिकेला अटक, सापळा रचून घातल्या बेड्या

देहविक्री व्यापार चालविणाऱ्या कव्वाली गायिकेला अटक, सापळा रचून घातल्या बेड्या

शरीरविक्रयाचा व्यापार करणाऱ्या एका ४० वर्षीय महिला कव्वाली गायिकेला मीरा-भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने अटक केली...

ठाणे : शरीरविक्रयाचा व्यापार करणाऱ्या एका ४० वर्षीय महिला कव्वाली गायिकेला मीरा-भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने अटक केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील या कारवाईत अटक करण्यात आलेल्या कव्वाली गायिकेचे नाव रोशनी बबलू शेख असे आहे. तिला २६ फेब्रुवारीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. रोशनी ही मुंबईतील सांताक्रूझ, अंधेरी, दहिसर, बोरिवली आणि इतर भागात वेश्या व्यापार चालवीत होती. त्या संबंधात पोलिसांकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशिमीरा येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रसिद्ध भोजनालयात सापळा रचून तिला पकडले. त्यांनी तेथे एका पीडित महिलेचीही सुटका केली तसेच काही रोख रक्कमही जप्त केली.

सुटका करण्यात आलेल्या महिलेला पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले आहे. वरिष्ठ निरीक्षक समीर अहिरराव यांनी सांगितले की, आरोपी महिलेविरुद्ध अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in