टोल फ्री क्रमांकामुळे खड्डयांच्या तक्रारीबाबत त्वरीत निवारण; उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

पावसानंतर डांबरीकरणाने सर्व रस्ते सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
 टोल फ्री क्रमांकामुळे खड्डयांच्या तक्रारीबाबत त्वरीत निवारण; उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

जुलै महिन्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील खड्डयांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जुलैमध्ये ५५५ मि.मी. सरासरीच्या प्रमाण असतांना आतापर्यंत १०१० मि.मी. पाऊस झालेला असून सततच्या पावसामुळे खड्डे भरण्याच्या कामातही अडचणी येत आहेत. त्याही परिस्थितीत कोल्ड मिक्स,पेव्हर ब्लॉक, खडीकरण व रेडीमिक्सच्या माध्यमातून खड्डे भरण्याची कामे सुरू ठेवण्यात आली आहेत. महापालिकेच्या १० प्रशासकीय प्रभागासाठी १३ अभिकरणांची नियुक्ती करण्यात आली असून त्या सर्वांमार्फत खड्डे भरण्याची कामे सुरू आहेत. दररोज जवळपास १५०० ते २००० चौ.मी. खड्डे भरण्याचे काम करण्यात येत आहे.

पावसाचा जोर काही प्रमाणात आता ओसरला असून प्राप्त परिस्थितीत कामे वेगाने करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पावसानंतर डांबरीकरणाने सर्व रस्ते सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच पालिकेच्या या उपक्रमात सहभागी देखिल मोठ्या प्रमाणात झाले आहेत.

खड्डयांच्या तक्रारीबाबत ०२५१-२२०११६८ हा दुरध्वनी क्रमांक महापालिकेने जाहीर केला असून त्यावर अद्यापपर्यंत २४7 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी इतर विभागांशी निगडित २७ तक्रारी आहेत. महापालिकेशी संबंधित तक्रारी सर्व प्रभागात पाठविल्यानंतर त्यांचे निराकरण करण्यात येत आहेत. प्राप्त तक्रांरीपैकी १५५ तक्रारींचे निवारण महापालिकेने केलेले आहे.

महापालिका क्षेत्रातील कल्याण शिळ रस्ता हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारीत असून डोंबिवली येथील मानपाडा रोड (स्टार कॉलनी ते मानपाडा जंक्शन), एमआयडीसी डायव्हर्शन रोड (टाटा पॉवर ते बंदिश पॅलेस), पेंढारकर कॉलेज रोड हे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग, बदलापूर पाईपलाईन रस्ता व डोंबिवली औद्योगिक क्षेत्र फेज १ व २ हे म.औ.वि.मं. च्या अखत्यारीत असून सदर रस्त्यांच्या दुरूस्तीची जबाबदारी संबंधीत विभागाची आहे, याबाबत संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in