ठाकुर्ली-कल्याणदरम्यान पत्रिपुलाजवळील रेल्वेरुळाला तडा

तांत्रिक विभागाचे कर्मचारी जाऊन त्यांनी ट्रॅक दुरुस्ती केली आणि सकाळी ७.१५ च्या सुमारास वाहतूक सुरू झाली.
ठाकुर्ली-कल्याणदरम्यान पत्रिपुलाजवळील रेल्वेरुळाला तडा
Published on

मंगळवारी सकाळच्या सुमारास मोठा अपघात टळला. ठाकुर्ली आणि कल्याणजवळील पत्रिपुलाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना मंगळवारी सकाळी ६.३५ च्या सुमारास घडली. त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य लांबपल्याच्या गाड्या ठाकुर्ली, डोंबिवली, दिवा मार्गावर खोळंबल्या होत्या. यावेळी कार्यरत लाईनमन्सच्या रुळाला तडा असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पातळीवर सूचित करून पुढील धोका टाळण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे लांबपल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतूक तातडीने थांबवण्यात आली होती. घटनास्थळी रेल्वेचे तांत्रिक विभागाचे कर्मचारी जाऊन त्यांनी ट्रॅक दुरुस्ती केली आणि सकाळी ७.१५ च्या सुमारास वाहतूक सुरू झाली.

मध्य रेल्वेवर लोकल बिघाडासह अन्य घटनांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंगळवारी सकाळी ६.३५ च्या सुमारास ठाकुर्ली आणि कल्याणजवळील पत्रिपुलाजवळ रेल्वे रुळाला तडा गेला. या घटनेची वेळ म्हणजे या मार्गावरील प्रवाशांची सर्वाधिक गर्दीची वेळ. मात्र कार्यरत लाईनमन्सच्या रुळाला तडा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठाना सूचित करून पुढील धोका टाळण्यासाठी लांबपल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतूक तात्काळ थांबवल्या. तब्ब्ल पाऊण तासाच्या दुरुस्तीनंतर डाऊन मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. दरम्यान, सकाळी गर्दीच्या वेळेस झालेल्या घटनेमुळे प्रवाशांचे हाल झाले. तासभर गाड्यांना विलंब झाल्याने या मार्गावरील सर्व स्थानकात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत होती.

logo
marathi.freepressjournal.in