गौरी-गणपती उत्सवाच्या खरेदीवर पावसाचे विघ्न, व्यापारी तसेच नागरिकांमध्ये धास्ती

मुरबाड बाजारपेठेत गौरी-गणपती सणाच्या सजावटीचे दुकाने मोठ्या प्रमाणात सजली आहेत, मात्र पावसाचा जोर अधिक असल्यामुळे त्याचा फटका दुकानदारांना सहन करावा लागत आहे.
गौरी-गणपती उत्सवाच्या खरेदीवर पावसाचे विघ्न, व्यापारी तसेच नागरिकांमध्ये धास्ती
Published on

मुरबाड : गौरी-गणपती सण अवघ्या सहा दिवसांवर आला असताना भक्तगणांच्या खरेदीवर पावसाने बंधने आणल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मुरबाडमध्ये सध्या पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे सगळीकडे पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यात प्रत्येक रस्त्यात खड्डे अधिक असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. पावसाच्या भीतीमुळे गौरी-गणपती, मखर सजावट तसेच विविध जीवनाश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांचा शुकशुकाट पहावयास मिळत आहे.

मुरबाड बाजारपेठेत गौरी-गणपती सणाच्या सजावटीचे दुकाने मोठ्या प्रमाणात सजली आहेत, मात्र पावसाचा जोर अधिक असल्यामुळे त्याचा फटका दुकानदारांना सहन करावा लागत आहे.

अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरत असल्यामुळे दुकानातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. गौरी-गणपती सणासाठी विविध पदार्थ बनवण्यासाठी जीवनाश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी अनेकजण किराणा दुकान तसेच मॉलचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे.

मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे वापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गणेशोत्सवामध्ये विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटनांना आळा न बसल्यास नागरिक रस्त्यावर येतील, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in