राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला तीव्र विरोध; कार्यक्षम उमेदवार देण्याची भाजप शहर अध्यक्षाची मागणी

मागील पाच वर्षांत खासदार राजेंद्र गावीत यांच्याकडून जनहिताचे कोणतेही ठोस काम मतदारसंघात किंबहुना वसई-विरार शहरात झालेले नाही.
राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला तीव्र विरोध; कार्यक्षम उमेदवार देण्याची भाजप शहर अध्यक्षाची मागणी
Published on

वसई : आगामी लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांना मतदारसंघात नागरिकांचा तीव्र विरोध असून, राजेंद्र गावित यांच्या व्यतिरिक्त महायुतीने कार्यक्षम उमेदवार देण्याची मागणी भारतीय जनता पक्ष वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर यांनी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना खासदार राजेंद्र गावीत यांच्याबद्दल मतदारसंघात तीव्र नाराजी आहे. मागील पाच वर्षांत खासदार राजेंद्र गावीत यांच्याकडून जनहिताचे कोणतेही ठोस काम मतदारसंघात किंबहुना वसई-विरार शहरात झालेले नाही. तथा मागील महिन्याभराचा कार्यकाळ सोडला, तर मागील पाच वर्षांत खासदार राजेंद्र गावीत यांनी मतदारसंघाकडे विशेषतः वसई-विरार परिसराकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्याविरुद्ध प्रचंड नाराजी आहे. राजेंद्र गावीत यांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल स्थानिक शेतकरी, कामगार, मच्छीमार मोठ्या संख्येने नाराज आहे. त्यामुळे गावीत यांच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये भाजपबद्दल नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in