मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याची आ.राजेश पाटील यांची मागणी

बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया यांना एका पत्राद्वारे दिले आहे
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याची आ.राजेश पाटील यांची मागणी

मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ४८ मधील रस्त्यामध्ये पडलेले खड्डे, साचलेले पाणी, गाळ काढण्याचे काम त्वरित करा अन्यथा टोल बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया यांना एका पत्राद्वारे दिले आहे. सदर पत्रात त्यांनी नमूद केले आहे की मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ४८ हा पालघर जिल्ह्यातून गुजरात राज्यात जाणारा एकमेव महामार्ग आहे.

या महामार्गाला पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, विक्रमगड, तलासरी ही महत्त्वाची तालुके जोडलेली असल्याने बहुतांश नागरिक हे या मार्गावरून वसई- विरार शहर, मुंबई शहर, शहर, गुजरात या ठिकाणी कामाच्या निमित्ताने येजा करीत असतात. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत.

तसेच महामार्गाच्या डिव्हायडर लगत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून बऱ्याचशा लोकांचा अपघात होऊन मृत्यु झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in