कारगिल विजय दिनानिमित्त डोंबिवलीत रॅलीचं आयोजन

या रॅलीत १२ शाळांचे मिळून २०५ विद्यार्थ्यांसह ४० शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला
कारगिल विजय दिनानिमित्त डोंबिवलीत रॅलीचं आयोजन

डोंबिवली : कारगील विजय दिनाच्या निमित्ताने डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि रोटरी क्लब मीटडाऊन, सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन, अनेक शाळा,आरएसपी शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सकाळी आठ वाजता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा समावेश होता.

यावेळी विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत जनजागृती केली. रॅलीत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात सामजिक संदेश देणारे विविध पोस्टर्स, बॅनर्स द्वारे देण्यात आले होते. या रॅलीत १२ शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता, २०५ विद्यार्थी, ४० शिक्षक सहभागी झाले होते. कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक, घारडा सर्कल डोंबिवली पूर्व या ठिकाणी शहिदांना आदरांजली अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in