वसईत अल्पसंख्यांक शाळेत विद्यार्थ्यांकडून राम नामाचा गजर

या उपक्रमाबद्दल मदर वेलंकनी शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा आशा मॅथू डिसोझा आणि त्यांच्या शिक्षक वर्गाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
वसईत अल्पसंख्यांक शाळेत विद्यार्थ्यांकडून राम नामाचा गजर
Published on

वसई : मदर वेलंकणी शैक्षणिक संस्थेच्या तुळींज, नालासोपारा येथील आशा दीप अध्यापक महाविद्यालयात अयोध्येतील राममंदिर प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमीत्त विध्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या अध्यक्षा, मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग आणि विध्यार्थ्यांसह रामाचा ध्वज हातात घेऊन, शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. एका अल्पसंख्यांक शाळेतून विद्यार्थ्यांकडून झालेला राम नामाचा गजर हा तालुक्यात औत्सुक्याचा विषय ठरतो आहे. या उपक्रमाबद्दल मदर वेलंकनी शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा आशा मॅथू डिसोझा आणि त्यांच्या शिक्षक वर्गाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

यावेळी बोलतांना मदर वेलंकनी शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा आशा मॅथू डिसोझा म्हणाल्या, भारत विकास आणि अध्यात्माच्या मार्गाकडे वाटचाल करत असताना, अयोध्येत राममंदिराच्या उद्घाटनासह आपण आध्यात्मिक समरसतेच्या नवीन युगात प्रवेश करत आहोत. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरात मोठा उत्साह आहे. अयोध्या राम मंदिर हे श्रद्धा, एकता आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक दिवसात विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग घेत, भारतीय परंपरा आणि आदर्श समजून घेतले पाहिजे म्हणून आम्ही शाळेमध्ये प्रश्न मंजुषा, भाषण आणि वादविवाद स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, असेही डिसोझा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in