रामगिरी महाराजांविरुद्ध एफआयआर नोंदविला

नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील शाहपांचाळे गावात आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात रामगिरी महाराजांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी महाराजांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
रामगिरी महाराजांविरुद्ध एफआयआर नोंदविला
x
Published on

ठाणे : नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील शाहपांचाळे गावात आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात रामगिरी महाराजांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी महाराजांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

याआधी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथेही रामगिरी महाराजांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. बांगलादेशात हिंदूवर अत्याचार करण्यात आले त्यावरील प्रतिक्रिया म्हणून आपण वक्तव्य केल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदूंनी एकत्र व्हावे हा आपला उद्देश होता, आता जे होईल त्याला आपण सामोरे जाऊ, असेही रामगिरी महाराजांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in