अत्यल्प पाऊसामुळे रानसई धरण आटले,पाणी जपून वापरा असे आवाहन

गेल्यावर्षी रानसई धरणात या दरम्यान ५०७ मीमी पाऊस पडला होता आणि धरणातील पाण्याची पातळी १०२.०६ फूट होती
अत्यल्प पाऊसामुळे रानसई धरण आटले,पाणी जपून वापरा असे आवाहन

उरण तालुक्यातील एमआयडीसीचे रानसई धरण आटले असून फक्त २जुलै पर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असून उरणकरांना सध्या मृत (राखीव) साठ्यातून पाणी पुरवठा सूरू आहे. रानसई धरण परिसरात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन एमआयडीसी कडून करण्यात येत आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठी खूप कमी आहे. गेल्यावर्षी रानसई धरणात या दरम्यान ५०७ मीमी पाऊस पडला होता आणि धरणातील पाण्याची पातळी १०२.०६ फूट होती आणि धरणातील पाणीसाठा ५एमसीएम पर्यंत होता. मात्र यावर्षी धरणात फक्त ७० मीमी पाऊस झाला असून पाण्याची पातळी ८४.११ फुट असून १.४० एमसीएम पाणीसाठा शिल्लक आहे.

उरण तालुक्याला रोज ३५एमलडी पाण्याची गरज लागते. त्यापैकी ३ एमएलडी पाणी रानसई धरणातून घेतले जाते. तर, रोज ७ एमएलडी पाणी सिडको कडून विकत घेऊन उरण करांची गरज भागवली जाते. सुमारे ६.८ चौरस किलोमीटर क्षेत्रात हे धरण आहे. या धरणात दहा मिलियन क्यूबिक मिटर पाणीसाठविण्याची क्षमता आहे.

येत्या ५-६ दिवसात पाऊस झाला नाही तर रानसई धरणातील सर्व पाणी संपणार आहे आणि पाणी टंचाई भासणार आहे. त्यामुळे ही पाण्याची उणीव भरून कशी काढणार असा सवाल विचारण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in