रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देणार -दानवे ;डहाणू येथील कार्यक्रमासाठी रावसाहेब दानवे यांची उपस्थिती

लोकल प्रवाशांची गैरसोय न करता आपण विशेष ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून डहाणूला आलो.
रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देणार -दानवे ;डहाणू येथील कार्यक्रमासाठी रावसाहेब दानवे यांची उपस्थिती

पालघर/वार्ताहर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आदिवासी महान्याय अभियानामधील आदिवासी लाभार्थींशी आभासी संवाद साधण्यासाठी डहाणू तालुक्यातील नरेशवाडी येथे आयोजित कार्यक्रमासाठी पालघर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी मुंबई ते डहाणू असा विशेष ट्रेनने प्रवास करून आपली उपस्थिती नोंदवली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी आदिवासींशी आभासी पद्धतीने संवाद साधताना आदिवासींच्या हक्कांच्या घरासाठी ५४० कोटी रुपयांचा हप्त्याची रक्कम वर्ग केल्याची घोषणा केली. तसेच यावेळी दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लोकलऐवजी विशेष ट्रेनने प्रवास सुकर असल्याचे सांगत रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाशी आभासी पद्धतीने संवाद साधला. अतिमागास आदिवासी गटातील (पीव्हीटीजी) एक लाख लाभार्थी कुटुंबांना कायमस्वरूपी घरांसाठी ५४०कोटी रुपयांचा पहिला हप्ताही जारी करण्यात आला. सरकारने प्रत्येक घरासाठी अडीच लाख रुपये वर्ग केले आहेत, अशी माहिती देऊन मोदी म्हणाले, की सरकारच्या कल्याणकारी योजनांपासून कोणीही वंचित राहू नये हा आमचा प्रयत्न आहे. सरकारी योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचल्यावरच देशाचा विकास होऊ शकतो.

यावेळी खासदार राजेंद्र गावीत, जिल्हापरिषद अध्यक्ष प्रकाश निकम जिल्हाधिकारी गोविंद बोडके, मुख्यकार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, आमदार विनोद निकोले, जिल्हापरिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

रेल्वेच्या प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी रेल्वेने प्रवास

दरम्यान, लोकल प्रवाशांची गैरसोय न करता आपण विशेष ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून डहाणूला आलो. माझ्यासोबत रेल्वेचे अधिकारी व पदाधिकारी सोबत होते. मला काही कामांची पाहणी करायची होती, असे नमूद करून मी विशेष असे काही मुद्दाम केले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जनतेच्या सेवेसाठी रेल्वेच्या पायाभूत सोयीसुविधांवर भर देणार असल्याची माहिती दिली. यावेळी दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासींसाठी आखलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in