अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गुन्हा दाखल

सदरील आरोपी याने अल्पवयीन पीडितेसोबत प्रेमसंबंध ठेवून ऑगस्ट २०२३ साली तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले होते.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गुन्हा दाखल

भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून पीडितेला तीन महिन्याची गर्भधारणा केल्या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही बळजबरीने तिच्याशी संबध ठेवून तिला तीन महिन्याची गर्भधारणा केल्याने आरोपी वलीम शेख (वय २० वर्ष) यांच्यावर बलात्कारासह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील आरोपी याने अल्पवयीन पीडितेसोबत प्रेमसंबंध ठेवून ऑगस्ट २०२३ साली तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानुसार भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२) (आय) (एन) सह पोस्को कायदा कलम ४, ८, १२ प्रमाणे नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदरील गुन्ह्याचा तपास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम सकुंडे हे करत आहेत. तर आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in