रेशनिंग दुकानदाराचा ग्राहकांच्या जीवाशी खेळ: उंदराची विष्ठा व ड्रेनेज पाणी मिश्रित धान्य; भाजप महिला आक्रमक

रेशनिंग कार्डात नाव वाढले असताना देखील जादा धान्य दिले जात नाही.
रेशनिंग दुकानदाराचा ग्राहकांच्या जीवाशी खेळ: उंदराची विष्ठा व ड्रेनेज पाणी मिश्रित धान्य; भाजप महिला आक्रमक

ठाणे : दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी येथील दुकान क्र ४८ फ १०८ या स्वस्त धान्याच्या रेशनिंग दुकानाचा दिवा भाजप महिला मोर्चा अध्यक्षा सपना रोशन भगत यांनी भांडाफोड केला आहे. सदर दुकानात उंदराची विष्ठा असलेले व ड्रेनेजचे पाणी मिश्रित धान्य धान्य वाटप करताना आढळून आल्याने दिव्यातील अनेक महिलांनी दिवा भाजप महिला मोर्चाच्या सपना भगत यांच्याकडे तक्रारी केल्याने सदर दुकानावर अनेक महिला दुकानावर धडकल्या व दुकान दारास धारेवर धरले. आपल्या सोयीप्रमाणे दुकान उघडण्याचे मनमानी धोरण राबवले जात असल्याने पहाटे चार वाजल्यापासून लाईन लावावी लागते, तर तुम्ही वेळेत आले नाही म्हणून धान्य परत गेले, अशी उत्तरेही देऊन ग्राहकांना माघारी पाठवले जाते. रेशनिंग कार्डात नाव वाढले असताना देखील जादा धान्य दिले जात नाही. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे नागरिकांच्या सुविधेसाठी शहरातील स्वस्त धान्य दुकाने सकाळी चार तास दुपारनंतर चार तास व ज्या ठिकाणी आठवडे बाजार असतो तेथे पूर्णवेळ दुकाने खुली ठेवून लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्याचा नियम असताना कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता सवडीनुसार दुकाने सुरू ठेवत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी भाजप कार्यालयात दिल्या आहेत. संबंधित तक्रार प्रशासनास देऊन कडक कारवाई करण्याठी सपना भगत आक्रमक पाऊल उचलणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in