ठाणे जिल्ह्यात २ हजार ७५९ कुणबी मराठा दाखल्यांच्या नोंदी सापडल्या

महसूल विभागाने तपासली सहा दिवसांत तब्बल १६ लाख कागदपत्रे
ठाणे जिल्ह्यात २ हजार ७५९ कुणबी मराठा दाखल्यांच्या नोंदी सापडल्या

ठाणे : मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील महसूल विभागाने सहा दिवसांत तब्बल १६लाख कागदपत्र तपासली असून, त्यामध्ये दोन हजार ७५९कुणबी मराठा दाखले वितरित केल्याच्या नोंदी मिळाल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यात शिंदे समितीच्या शिफारशी नुसार कुणबी मराठा दाखले त्यांच्या नोंदी शोधण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्यानुसार ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी महसूल विभागाला नोंदी शोधण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार मागील रविवार पासून महसूल विभागातील कर्मचारी रात्री उशिरापर्यंत नोंदी शोधाण्याचे काम करत आहेत. आत्तापर्यंत १६लाख पेक्षा जास्त नोंदी तपासन्यात आल्या असून त्यामध्ये दोन हजार ७५९कुणबी मराठा असे दाखले दिल्याच्या नोंदी सापडल्या असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शाळेतील नोंदी म्हत्वाच्या

कुणबी मराठे हे दाखले मिळविण्यासाठी शाळेतील नोंदी म्हत्वाच्या आहेत. महसूल विभागा ऐवजी शाळेतील नोंदी तपासल्या तर कुणबी मराठा दाखले देणे सोपे होईल, असे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. ब्रिटिश काळापासून शाळांमध्ये जात आणि धर्माची नोंद असते. त्या नोंदी कुणबी मराठा दाखले देण्यासाठी सोप्या पडतील, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in