मुरबाड-कल्याण माळशेजघाट रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्यावरच शासन प्रशासन जागे होतात अशी भावना वाहनचालक तसेच नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे
मुरबाड-कल्याण माळशेजघाट रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

गेल्या जून महिन्यापासून मुरबाड-कल्याण - म्हारळ - वरप - कांबा माळशेजघाट येथील रस्त्यावर खड्डेचखडे पडले होते. आजारी रूग्णांना, चाकरमानी, शालेयविद्यार्थी, नागरिकांना यामुळे खूप त्रास सहन करावा लागत होता अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते.

सदर रस्त्यावरील खड्डयातील जीवघेणा प्रवास अशी बातमी दैनिक नवशक्ति मध्ये प्रकाशित होताच शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी जागे झाले असून रस्त्यावरील खडे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. प्रत्येक समस्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्यावरच शासन प्रशासन जागे होतात अशी भावना वाहनचालक तसेच नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. तसेच नागरिकांना होणार्या गंभीर त्रासाची दखल घेत खड्ड्यांबाबत वाचा फोडल्यामुळे दैनिक नवशक्तिचे सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे.

कल्याण - मुरबाड माळशेजघाट रस्त्याचा टेंडर झाल्याची चर्चा आहे. परंतू रस्त्याचे काम मुरबाड माळशेजघाटापर्यंत सुरू झालेले नाही. कल्याण-शहाड पुलापासून म्हारळपर्यंत कॉंक्रीट रस्त्याचे काम सेंच्युरी रॉयन कंपनीने तयार केल्याने त्यांचे नाव रस्त्याला देण्यात आल्याचे बॅनरवरून समजते. मात्र या भागाचा शासनाचा निधी कुठे खर्च झाला याची माहिती संबधित खात्याकडून मिळू शकलेली नाही.

मुरबाड रस्त्यावरील कांबापासून वाघेरापाडा येथील संपुर्ण रस्ता उखडला आहे. रस्त्याच्या एकबाजूचे काम सुरू आहे, मात्र रस्त्यांवरील खड्डे ठेकेदार बुजवत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एका रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे येणार्या जाणार्यांना पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

गणेशोत्सव विसर्जनासाठी याच रस्त्यावरून उल्हासनगर, म्हारळ, वरप, कांबा येथील गणपती मुर्तीचे विसर्जन पाचवा मैल रायता नदीवर केले जाते. यावर्षी उखडलेल्या रस्त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होण्याचा संभव असून शासनाने तात्काळ रस्त्याची पुर्णत: दुरूस्ती करावी अशी मागणी प्रवाशी वाहनचालक यांनी केली आहे. येथील पर्यायी रस्ता उपलब्ध व्हावा रस्त्यावरील खडे संपुर्ण तात्काळ बुजवावे अशी मागणी जोरधरू लागली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in