लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार, आरोपीला अटक

२० वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरुन नवघर पोलीस ठाण्यात भादंवि ३७६ (२), ५०६ अनव्ये धमकी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येऊन २५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मुंबईत अल्पवयिन मुलीवर बलात्कार
मुंबईत अल्पवयिन मुलीवर बलात्कारप्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूने वापरली जाते

भाईंदर : भाईंदर पूर्वेला नवघर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या २० वर्षीय पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर फेब्रुवारी २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंत विविध ठिकाणी वारंवार बलात्कार केला आणि तसेच शारीरिक संबंध न ठेवू दिल्यास जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊ लागला होता. याप्रकरणी २० वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरुन नवघर पोलीस ठाण्यात भादंवि ३७६ (२), ५०६ अनव्ये धमकी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येऊन २५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सदरील गुन्हा दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या आदेशानुसार आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असून, सदरील गुन्ह्याचा तपास नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवास गारळे हे करत आहेत. आरोपीला ठाणे न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in