रात्रंदिवस विद्युतपुरवठा खंडीत झाल्याने मुरबाडवासी हैराण

मुरबाड शहरात दररोज रात्री मध्यरात्री विद्युतपुरवठा खंडीत होतो त्यामुळे चोरटयांनी हौदाेस घातला आहे.
रात्रंदिवस विद्युतपुरवठा खंडीत झाल्याने मुरबाडवासी हैराण

मुरबाड शहरासह तालुक्यात रात्रंदिवस विद्युतपुरवठा खंडीत होत आहे. नुकताच धसई ओजिवले येथे पार पडलेल्या उज्ज्वल भारत उज्जवल भविष्य विद्युत महोत्सवात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी अधिकाऱ्यांना विद्युतपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी असा आदेश दिला होता, त्याला विद्युत वितरणाचे उपअभियंतानी केराची टोपली दाखवली आहे.

मुरबाड शहरात दररोज रात्री मध्यरात्री विद्युतपुरवठा खंडीत होतो त्यामुळे चोरटयांनी हौदाेस घातला आहे. वीजपुरवठा नसल्यामुळे शालेय विद्यार्थी, गृहीणी, चाकरमानी यांना त्रास सहन करावा लागत आहे. दिवसाही विद्युतपुरवठा खंडीत होत असल्याने शासनाने भारनियमन सुरू केल्याची चर्चा असून येथील नागरिक विद्युत वितरणाच्या विरोधात आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

गणेशोत्सव जवळ आला आहे १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनीही विद्युत पुरवठा खंडीत झाला होता प्रत्येक सणावाराला मुरबाडमधील विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. विद्युत वितरणचे उपअभियंता याकडे दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीस धरत आहेत.

मुरबाड तालुक्यात विद्युत महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा झाला होता त्यामध्ये स्थानिक आमदार उपस्थित नव्हते त्यांच्या दोघांच्या गटबाजीचा फटका मुरबाडवासियांना बसत आहे. मुरबाड शहरात विद्युत वाहिनी तुटून पडतात.

विद्युतपोल खचलेले आहेत, अपुरे कर्मचारीवर्ग असल्याने मुरबाडचा खंडीत झालेला विद्यूतपुरवठा लवकर सुरक्षित होत नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुरबाड उपविभागीय कार्यालयात लोकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. तक्रारी देतांना अधिकारी कार्यालयात उपस्थित नसतात अशा तक्रारी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्याकडे केली असताना देखिल यावर कोणताही ठोस उपाययाेजना आजपर्यंत करण्यात आलेला नाही.

शहरातील विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत न झाल्यास आंदोलन करणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in