महायुतीत वादाची ठिणगी! "शिवतारेंना वेळीच आवर घाला, अन्यथा..."; आनंद परांजपेंचा शिवसेना शिंदे गटाला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वाभिमानी कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांविरोधातील शिवराळ भाषा सहन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना वेळीच आवर घालावा, अन्यथा...
महायुतीत वादाची ठिणगी! "शिवतारेंना वेळीच आवर घाला, अन्यथा..."; आनंद परांजपेंचा शिवसेना शिंदे गटाला इशारा

ठाणे : बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात वणवा पेटला असून त्याची झळ कल्याण लोकसभा मतदारसंघाला बसली आहे. बारामती येथील वाद संपवा, अन्यथा कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी देखील उतरेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

"राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वाभिमानी कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांविरोधातील शिवराळ भाषा सहन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना वेळीच आवर घालावा, अन्यथा कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवाराला निवडणूक जड जाईल", असे परांजपे म्हणाले.

माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शिवराळ भाषेत आरोप करून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना वेळीच आवर घालावा, अन्यथा कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवाराला निवडणूक जड जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वाभिमानी कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांविरोधातील शिवराळ भाषा सहन करणार नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघात वेगळा निकाल लागू शकतो. जर महायुतीमधील समन्वयक टिकून राहावा असे मुख्यमंत्री शिंदे यांना वाटत असेल तर आपल्या पक्षातील वाचाळवीरांना समज द्यावी." - आनंद परांजपे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे जिल्हा

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in