'रिव्हर्स लेन'मुळे ठाणे ते मुंबई प्रवास सुसाट! पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी फुटणार; ठाणे वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय

वाहनचालकांकडून या निर्णयाचे स्वागत होत असून, सकाळच्या वेळेत मुंबईकडे जाताना होणारा त्रास आता मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सकाळी ७ ते ९ या गर्दीच्या वेळेत मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याचे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
'रिव्हर्स लेन'मुळे ठाणे ते मुंबई प्रवास सुसाट! पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी फुटणार; ठाणे वाहतूक पोलिसांचा निर्णय
'रिव्हर्स लेन'मुळे ठाणे ते मुंबई प्रवास सुसाट! पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी फुटणार; ठाणे वाहतूक पोलिसांचा निर्णय
Published on

ठाणे : पूर्व द्रुतगती मार्गावरील (इस्टर्न एक्सप्रेस हायवे) पुलाच्या कामामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर निर्माण झालेल्या वाहतूक अडचणींवर ठाणे वाहतूक पोलिसांनी प्रभावी उपाययोजना राबवली आहे. चार पदरी रस्ता दोन पदरी झाल्याने सकाळच्या गर्दीच्या वेळी मोठ्या वाहतूककोंडीची शक्यता होती. मात्र ‘रिव्हर्स लेन’च्या निर्णयामुळे कोंडी मोठ्या प्रमाणात टळली असून वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

'रिव्हर्स लेन'मुळे दिलासा

सकाळी ७ ते ९ या गर्दीच्या वेळेत मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याचे लक्षात घेऊन, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत मुंबईहून ठाण्याकडे येणारी एक लेन तात्पुरती बंद करून ती ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करण्यात आली. या अभिनव प्रयोगामुळे पूर्वी लागणाऱ्या लांबच लांब वाहनांच्या रांगा कमी झाल्या असून प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या घटला आहे.

वाहनचालकांकडून स्वागत

या लोकाभिमुख उपक्रमाचे वाहनचालकांकडून स्वागत होत असून, सकाळच्या वेळेत मुंबईकडे जाताना होणारा त्रास आता मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. समस्येवर तात्काळ उपाय शोधत ठाणे वाहतूक पोलिसांनी कार्यक्षमतेचा आणि नियोजनाचा आदर्श निर्माण केल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.

घोडबंदर, कल्याण तसेच शहरातील विविध भागांतून येणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा फायदा होत आहे. या प्रयोगाची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलिसांना प्रत्यक्ष रस्त्यावर उभे राहून मोठी कसरत करावी लागत आहे. उन्हातान्हात वाहतूक नियंत्रण, वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन तसेच अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितींवर तात्काळ उपाययोजना करण्याचे काम अत्यंत दक्षतेने केले जात आहे.

दिलीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा

सकाळच्या गर्दीच्या वेळेत नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि वाहतूक सुरळीत राहील, यासाठी रिव्हर्स लेनचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थितीनुसार पुढील काळात आवश्यक ते बदल करण्यात येतील.

पंकज शिरसाठ, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा

logo
marathi.freepressjournal.in