हिट ॲण्ड रन कायद्याविरोधात रिक्षाचालक आक्रमक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रिक्षाचालकांनी एकत्र येत या कायद्याचा निषेध व्यक्त केला.
हिट ॲण्ड रन कायद्याविरोधात रिक्षाचालक आक्रमक

कल्याण : हिट ॲण्ड रन कायद्याविरोधात कल्याणमध्ये रिक्षाचालक आक्रमक झाले असून भाजप वाहतूक संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक मल्हारी गायकवाड यांच्या नेतृत्वात रिक्षा, टॅक्सीचालक-मालक संयुक्त कृती समिती, कल्याणला संलग्न असलेल्या संघटनांचे पदाधिकारी महेंद्र मिश्रा, ठाणे जिल्हा अध्यक्ष, संघर्ष सेना ऑटो रिक्षा युनियन, विल्सन काळकुंड प्रदेश अध्यक्ष भाजप वाहतूक संघटना, मोहन पाठारे कल्याण शहराध्यक्ष रिपब्लिक दिशा टॅक्सीचालक-मालक संघटना, राहुल वारे संस्थापक अध्यक्ष रयत वाहतूक संघटना, सदाशिव सोनवणे कल्याण शहर अध्यक्ष न्यू एकता रिक्षा युनियन, निलेश व्यवहारे अपेक्षा टॅक्सीचालक-मालक संघटना यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्याआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रिक्षाचालकांनी एकत्र येत या कायद्याचा निषेध व्यक्त केला.

त्या निवेदनामध्ये हिट ॲण्ड रन हा कायदा किती जाचक आहे, अन्यायकारक आहे ते पटवून देण्यात आले आहे. आपल्या माध्यमातून पंतप्रधान यांना चालकांचा किती रोष आहे, हे माहीत करून देण्यासाठी चालकांनी निषेध केला. त्याचबरोबर जर हा कायदा रद्द न झाल्यास ऑटो-रिक्षाचालक-मालक संघटना, संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र संलग्न रिक्षा-टॅक्सी संघर्ष कृती समिती, कल्याण महाराष्ट्रभर आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.

कायदा जीवघेणा

अपघात हा अपघात असतो, अपघात ठरवून केलेला नसतो. वाहनचालक देखील नोकरी करतो. आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी त्यांचे शिक्षण करण्यासाठी इंजिनवर बसून अहोरात्र मेहनत करत असतो. अशात दुर्दैवी

अपघातासारखी काही घटना घडली तर त्याला व त्याच्या कुटुंबाला घरदार विकून भीक मागायची वेळ येईल. म्हणून हा अन्यायकारक जुलमी आणि वाहनचालकाचा जीवघेणा व आयुष्यातून उठवणारा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी रिक्षाचालकांच्या वतीने करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in