डोंबिवलीतील रिक्षाचालकांचा पालिकेच्या कार्यालयावर मोर्चा ; तीव्र आंदोलनाचा इशारा

रिक्षाचालकांनी डोंबिवलीतील पालिकेच्या `ह`प्रभाग क्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढला. रस्त्यात खड्डे पडल्याने वाहनचा अपघात होण्याची शक्यता असून रिक्षाचालकांसह प्रवाश्यांचा जीव धोक्यात
डोंबिवलीतील रिक्षाचालकांचा पालिकेच्या कार्यालयावर मोर्चा ; तीव्र आंदोलनाचा इशारा

रस्त्यात खड्डे पडल्याने शनिवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.यावेळी पोलिसांनी आंदोलन जरी करू दिले असले तरी नागरिकांनी प्रशासनावर टीका करणे सोडले नाही. आंदोलनाचे हे सत्र सुरूच सोमवारी रिक्षाचालकांनी डोंबिवलीतील पालिकेच्या `ह`प्रभाग क्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढला. रस्त्यात खड्डे पडल्याने वाहनचा अपघात होण्याची शक्यता असून रिक्षाचालकांसह प्रवाश्यांचा जीव धोक्यात असल्याचे सांगत रिक्षाचालकांनी सांगितले. कार्यालयावर आलेला मोर्चा पाहून बांधकाम नियंत्रण विभागाचे सहायक आयुक्त सुहास गुप्ते यांनी रिक्षाचालकांना समजण्याचा प्रयत्न केला. मात्र जीव गेल्यानंतर हे प्रशासन जागे होणार का असा प्रश्न रिक्षाचालकांनी उपस्थित केला. अखेर गुप्ते यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आठ दिवसात रस्त्यातील खड्डे बुजवा अन्यथा कल्याण येथील पालिका मुख्यालयात तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.

काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला शनिवारी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीवरून जाणाऱ्या अंकित राजकुमार थैवा ( २६ ) तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.याच दिवशी ठाकुर्लीतील रस्त्यांत खड्डे पडल्याने नागरिकांनी रस्तावर उतरून आंदोलन केले होते. डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा आणि जुनी डोंबिवली येथील रस्त्यांवर खड्डे पडल्याने सोमवारी रिक्षाचालकांनी `ह` प्रभाग क्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यात ३०० हून अधिक रिक्षाचालकांनी सहभाग घेतला होता.भर पावसात तब्बल दोन तास रिक्षाचालक कार्यालयाबाहेर उभे होते. रिक्षाचालक –मालक संघटना आणि रिक्षा चालक संघटनेच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्च्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन घेतली असले तरी हा विषय आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे स्पष्ट केले. काही वेळाने बांधकाम नियंत्रण विभागाचे सहायक आयुक्त गुप्ते यांनी रिक्षाचालकांची भेट घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. आठ दिवसात रस्त्यातील खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिल्यावर रिक्षाचालकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष राजा चव्हाण, उपाध्यक्ष भगवान मोरजकर, संदीप पाटील, सरचिटणीस दिंगबर लिंगायत, रिक्षाचालक-मालक युनियनचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे, उपाध्यक्ष शेखर जोशी, सरचिटणीस भिकाजी घोडे यांसह अनेक रिक्षाचालक आंदोलनात सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in