युवक काँग्रेसचा 'रोजगार दो, न्याय दो' मोर्चा

या कार्यक्रमात महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री तथा भिवंडी लोकसभा प्रभारी अनिस अहमद, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माथाडी सेलचे अध्यक्ष छगन पाटील आदींसह शेकडो कामगार व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते
युवक काँग्रेसचा 'रोजगार दो, न्याय दो' मोर्चा
Published on

भिवंडी : भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याआदेशानुसार, भिवंडी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिवंडीतील भंडारी कंपाऊंड ते देवजी नगरपर्यंत पायी 'रोजगार दो,न्याय दो' मोर्चा नुकताच काढण्यात आला होता. त्यानंतर देवजी नगरमध्ये मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.

या कार्यक्रमात महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री तथा भिवंडी लोकसभा प्रभारी अनिस अहमद, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माथाडी सेलचे अध्यक्ष छगन पाटील, भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव रेहाना अन्सारी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव डॉ. निलेश झेडगे, भिवंडी लोकसभा युवक काँग्रेसचे प्रभारी राहुल सिंग, भिवंडी युवक काँग्रेस पश्चिम अध्यक्ष दिनेश प्रजापती, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इक्बाल सिद्दीकी, नगरसेवक मुन्नाभाई, अबू शुफियान, डॉ.जुबेर अन्सारी, भिवंडी सेवा दलाचे अध्यक्ष शोएब अन्सारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक पाटोळे, ज्येष्ठ समाजसेवक शाहू साठे, सामाजिक कार्यकर्ते लहू कापसे, भिवंडी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आकाश कांबळे, सोशल मीडिया अध्यक्ष अय्याज खान, युवा कुणबी सेनेचे नेते राहुल सुधाकर पाटील, भिवंडी युवक काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष सुरज पटेल, वीरेंद्र पटेल विश्वकर्मा, संदीप गजरमल, पियुष पाटोळे, सचिन कांबळे, साई चिल्का, अमित ढमाले, रवी वाघमारे आदींसह शेकडो कामगार व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in