‘आरटीई’प्रवेशातील दुसऱ्या प्रतीक्षा यादीची प्रक्रिया सुरू; कागदपत्र पडताळणीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन

ठाणे जिल्ह्यातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
‘आरटीई’प्रवेशातील दुसऱ्या प्रतीक्षा यादीची प्रक्रिया सुरू; कागदपत्र पडताळणीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन
Published on

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. मंगळवारी, ८ एप्रिल रोजी प्रतीक्षा यादी टप्पा क्र. २ मधील ९५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर प्रवेश प्रक्रियाची मुदत दि. ८ ते १५ एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे. यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना SMS पाठविण्यात येत आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांचे पालकांना शाळेच्या रिक्त जागेनुसार SMS पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE PORTAL वरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी, तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून दि. १५ एप्रिल, २०२५ रोजीपर्यंत कागदपत्रांची तपासणी करून आपल्या बालकांचा ऑनलाइन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

९५५ विद्यार्थ्यांचा प्रवेश

ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगरपालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध होते व आतापर्यंत ७ हजार ९४५ प्रवेश झाले आहेत. प्रतीक्षा यादी टप्पा क्र. ०२ मधील ९५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in