संततधार पावसामुळे रुंदे नदीचा पूल पाण्याखाली

काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील दळण वळणावर याचा प्रभाव पडला आहे.
संततधार पावसामुळे रुंदे नदीचा पूल पाण्याखाली

सतत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे रुंदे नदीवर असलेला पूल संपूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे येथील नागरिकांसमोर दळण वळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.

काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील दळण वळणावर याचा प्रभाव पडला आहे. काही ठीकाणी पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रुंदे पूल हा दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात असून यापूलामुळे रुंदा, फळेगाव, उशिद, मढ, आरेले, भोंगाळपाडा, हाल, इत्यादी गावातील स्थानिकांना येजा करण्यासाठी मदत होत असते. या भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हा पूल संपुर्णत: पाण्याखाली गेला आहे. तसेच इतर गावात पाणी भरल्यामुळे नागरिकांचा जनसंपर्क तुटलेला आहे. दरम्यान शाळकरी विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाना सदरच्या पुराच्या पाण्यामुळे आपआपल्या घरी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.

तर काळू नदीवरील गुरवली पुलाला देखील पुरासाघे पाणी लागण्याचे संकेत असून खूपच मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह ओसंडून वाहत आहे. दरम्यान संततधार सुरु असलेल्या पावसामुळे आपत्कालीन व्यवस्था दक्ष राहणे जरुरीचे असून अति महत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in