संजय केळकरांनी चमत्कार करून दाखवावाच; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा सूचक टोला

ठाण्यातील आगामी राजकीय गणिताच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी नुकतेच आमदार संजय केळकर हे 'चमत्कार घडवतील' असे वक्तव्य केले होते. या विधानाला आता परिवहमंत्री प्रताप सरनाईक यांनी सूचक प्रतिसाद दिला आहे. 'केळकरांकडून चमत्कार अपेक्षित आहे, आणि त्यांनी तो करूनच दाखवावा, असे अप्रत्यक्षपणे आव्हान दिले.
संजय केळकरांनी चमत्कार करून दाखवावाच; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा सूचक टोला
संजय केळकरांनी चमत्कार करून दाखवावाच; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा सूचक टोला
Published on

ठाणे : ठाण्यातील आगामी राजकीय गणिताच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी नुकतेच आमदार संजय केळकर हे 'चमत्कार घडवतील' असे वक्तव्य केले होते. या विधानाला आता परिवहमंत्री प्रताप सरनाईक यांनी सूचक प्रतिसाद दिला आहे. 'केळकरांकडून चमत्कार अपेक्षित आहे, आणि त्यांनी तो करूनच दाखवावा. त्या चमत्काराचा लाभमहायुतीलाच होणार आहे,' असे त्यांनी स्पष्टपणे सांगत केळकरांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले.

प्राण्यांच्या स्मशानभूमीच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सरनाईकांनी महायुती सरकारच्या कामगिरीचा उल्लेख केला. 'बिहार आणि महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्याने विकासाचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे,' असे सांगत त्यांनी महाराष्ट्रातील २८८ पैकी २२७ जागांवर विजय मिळवून महायुतीने आपली ताकद सिद्ध केली, असेही नमूद केले.

ठाण्यात महायुतीचीच सत्ता कायम

मीरा-भाईंदरमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतलेल्या जनता दरबाराबाबत बोलताना सरनाईक म्हणाले की, वनजमिनीवरील अतिक्रमणांसह अनेक प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार गरजेचा आहे. अशा उपक्रमांमुळे प्रत्यक्ष जनतेच्या समस्या सुटतात. त्यांनी पालघरमध्येही अशाच प्रकारचे जनसंपर्क उपक्रम झाल्याचे सांगितले. संजय केळकरांविषयी बोलताना सरनाईक म्हणाले, ते ठाण्याचे सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार आहेत. ते निश्चितच महायुतीचे दावेदार आहेत. ठाण्यात महायुतीची सत्ता आहे, आणि भविष्यातही ती कायम राहणार.

राहुल गांधीप्रमाणे रोहित पवारांची अवस्था

आमची महायुती भक्कम आहे. आम्हाला इतर कोणासोबत युतीची गरज नाही; उलट तेच आमच्यासोबत युतीसाठी आग्रह धरतात, असे सरनाईक यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांच्या पराभवाचा उल्लेख करत त्यांनी बिहारमध्ये राहुल गांधी यांची जी अवस्था झाली, तशीच अवस्था महाराष्ट्रात रोहित पवारांची होईल, अशी टीकाही सरनाईकांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in