सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ मीरा-भाईंदरमध्ये  काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ मीरा-भाईंदरमध्ये काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.
Published on

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडी ने दुसऱ्या दिवशी पुन्हा चौकशी साठी बोलावल्याने काँग्रेस ने मोदी सरकार वर दडपशाही चा आरोप करत मीरा रोड व भाईंदर मध्ये सत्याग्रह आंदोलन केले.

माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले. केंद्रातील मोदी सरकार सत्तेच्या व बहुमताच्या जोरावर सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून सुडाचे राजकारण करीत असून नॅशनल हेराल्ड केस आठ वर्षांपूर्वी बंद झाली असताना, त्यामध्ये कोणतेही तथ्य नसताना आगामी होऊ घातलेल्या विविध राज्यातील निवडणूका नजरेसमोर ठेवत केवळ गांधी परिवाराला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप मुझफ्फर हुसैन यांनी केला. मीरारोडच्या नया नगर व भाईंदर फाटक येथे आंदोलन झाले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, ज्येष्ठ नगरसेविका सय्यद नूरजहाँ हुसैन, मर्लिन डीसा, जुबेर इनामदार, अनिल सावंत, गीता परदेशी, सुरेश दळवी, प्रवक्ते प्रकाश नागणे, युवक काँग्रेसचे कुणालादित्य काटकर, दीप काकडे सह अन्य नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in