भिवंडीत शालेय बसचा अपघात ५५ विद्यार्थिनी थोडक्यात बचावल्या

तालुक्यातील पडघा टोल प्लाझा येथे सोमवारी पहाटे नाशिकहून शालेय मुलींना सहलीसाठी घेऊन जाणाऱ्या खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला
भिवंडीत शालेय बसचा अपघात ५५ विद्यार्थिनी थोडक्यात बचावल्या

भिवंडी : तालुक्यातील पडघा टोल प्लाझा येथे सोमवारी पहाटे नाशिकहून शालेय मुलींना सहलीसाठी घेऊन जाणाऱ्या खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले; मात्र सुदैवाने बसमधील ५५ विद्यार्थिनी या अपघातातून थोडक्यात बचावल्या. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

नाशिक जिल्ह्यातील बिलोली येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची सहल ठाण्यातील टिंकूजीनी वाडी येथे आयोजित करण्यात आली होती. यासाठी शाळेतील शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांसह दोन वेगवेगळ्या खासगी लक्झरी बसमधून पिकनिक पॉइंटवर जाण्यासाठी निघाले होते. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता ही बस भिवंडी तालुक्यातील पडघा टोलनाका परिसरात येताच सकाळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस चालत्या ट्रकला धडकली. या अपघातात बसच्या पुढील काचा फुटल्या; मात्र सुदैवाने बसमधील ५५ विद्यार्थिनी सुखरूप बचावल्या आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पडघा पोलीस रुग्णवाहिकेसह दाखल झाले, त्यांनी घटनेची माहिती मिळताच तपास सुरू केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in