माळशेज घाटातील लाकडी पुलाची चर्चा; गावकरी, शालेय विद्यार्थ्यांनी दगडाच्या बुरूजावर उभारला लाकडी पूल

दगडाला ही देव मानले तर त्याच्या श्रद्धेने जीवन प्रवास सुकर होतो असाच अनुभव अतिदुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना आला आहे.
माळशेज घाटातील लाकडी पुलाची चर्चा; गावकरी, शालेय विद्यार्थ्यांनी दगडाच्या बुरूजावर उभारला लाकडी पूल
Published on

मुरबाड : दगडाला ही देव मानले तर त्याच्या श्रद्धेने जीवन प्रवास सुकर होतो असाच अनुभव अतिदुर्गम भागातील फांगुळगव्हाण परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना आला आहे. जीवनाचा खडतर मार्ग सुकर करताना शिक्षण घेण्याची जिद्द हवी असते, याच जिद्दीच्या बळावर मुरबाड, मोरोशी, फांगुळगव्हाण येथील मोरोशी आश्रम शाळेमधील ८० विद्यार्थ्यांनी नदी पार केली. मुरबाड तालुक्यात दरवर्षी हजारो कोटी विकासकामे केली जात असल्याचा दावा केला जातो मात्र या कामांमध्ये नागरिकांच्या गरजेचा फांगुळगव्हाण नदीवरचा पूल राहून जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दोन नद्यांमधून मार्गक्रमण करण्यासाठी कोणताही सहारा नसताना जीवावर उदार होऊन विद्यार्थी, नागरिक आपली कामे पार पाडत असतात. सध्या पावसाचा जोर अधिक असल्यामुळे नदीचा प्रवाह देखील वाढल्यामुळे स्थानिकांचे येणे-जाणे देखील अडकून पडले होते. त्यामुळे मुरबाडच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी एकत्र येत वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात दगडाचे बुरूज उभे करून तात्पुरता लाकडाचा पूल उभा करून आपला मार्ग स्वत:हून निर्माण केला.

मुरबाड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागांनी दरवर्षी हजार कोटींची विकासकामे केल्याची गणना करून शासनाचा निधी खर्च केला. मात्र त्यांच्या हातून फांगुळगव्हाण नदीवरचा पूल राहून गेला. मुरबाडच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आणि गावकरी यांनी प्रचंड जोराने वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात शाळेत जाण्यासाठी दगडाचे बुरूज उभे करून लाकडाचा पूल उभा केलेला पाहिला नसेल तो पूल मुरबाड तालुक्याच्या अतिदुर्गम भागात साकारलेला आहे

मुरबाड शहरापासून ७० किलोमीटर अंतरावर वाड्या, वस्त्यांमध्ये सर्व सुविधांचा अभाव आहे. फांगुळगव्हाण गावांमधील शेजारील ८० शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक रात्रंदिवस याच हिफाजत पुलावरून धोकादायक प्रवास करतात. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी कोटी रुपये विकासकामांसाठी खर्च केले. परंतु फांगुळगव्हाणचा आदिवासी वाड्यांचा पूल कागदोपत्रीच राहिला.

logo
marathi.freepressjournal.in