कल्याणमधील शाळा सौरऊर्जेवर चालणार

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लोकसहभागातून महापालिकेच्या डोंबिवली पूर्व येथील पाथर्ली शाळा क्रमांक ६२ मध्ये सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या कामाचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या शुभहस्ते रविवारी करण्यात आला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

कल्याण : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लोकसहभागातून महापालिकेच्या डोंबिवली पूर्व येथील पाथर्ली शाळा क्रमांक ६२ मध्ये सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या कामाचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या शुभहस्ते रविवारी करण्यात आला. पाथर्ली येथील शाळा क्रमांक ६२ ही महापालिकेची कल्याण-डोंबिवलीतील पहिली सोलर शाळा म्हणून आता ओळखली जाणार असून महापालिकेच्या उर्वरित शाळांमध्ये देखील माहे मे पूर्वी लोकसहभागातून सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याची असल्याची माहिती महापालिका आयुक्त आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिली. आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी महापालिका शाळांचा संपूर्णतः कायापालट करण्यास प्रारंभ केला असून महापालिकेच्या शाळांमध्ये देखील आता सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित केल्याने विजेची पूर्णपणे बचत होणार आहे. सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी अर्थसहाय्य करणारे रिजन्सी निर्माण ग्रुपचे विकासक अनिल भतीजा, अत्यंत कमी वेळात ही यंत्रणा बसविणारे कॉस्मो इंटरप्राईजेस त्याचप्रमाणे यासाठी विशेष परिश्रम घेणारे महापालिकेचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, यांचा महापालिका आयुक्त यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in