सागरी गरुड प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

या प्रजातीला वाचविण्यासाठी काहीतरी उपाय योजना करुन संवर्धन करण्याची मागणी पक्षी प्रेमींनी केली आहे.
सागरी गरुड प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

सागरी गरुड ( सी इगल ) ही प्रजाती मोठ्या प्रमाणात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. समुद्रातील मासे हे त्यांचे मुख्य अन्न आहे. सर्रास समुद्र किनारी मोठ्या संख्येने हे गरुडपुर्वी दिसायचे आता यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने या प्रजातीची रेडझोन मध्ये नोंद झाली आहे. तरी या प्रजातीला वाचविण्यासाठी काहीतरी उपाय योजना करुन संवर्धन करण्याची मागणी पक्षी प्रेमींनी केली आहे.

समुद्रकिनारी अवकाशात घिरट्या घालीत समुद्रातील माशांवर नजर ठेवून झेप घेऊन अचूक पणे टिपणारी ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पुर्वी समुद्रकिनारी अवकाशात मोठ्या प्रमाणात घिरट्या घालत असताना दिसायचे पण आता एखादाच सागरी गरुड नजरेस पडत आहे. समुद्रकिनारा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, समुद्री जंगल नष्ट होत असल्याने या प्रजातीचा आदिवास नष्ट होत असल्याचे पक्षी प्रेमींनी मनोगतात सांगितले आहे.

पॅलासचे मासे गरुड, ज्याला पॅलासचे समुद्र गरुड किंवा बँड-टेलेड फिश ईगल असेही म्हणतात, हा एक मोठा, तपकिरी सागरी गरुड आहे. कझाकस्तान, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, मंगोलिया, चीन, भारत, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि भूतानमधील पूर्व पॅलेर्क्टिकमध्ये त्याची पैदास होते. ते रेडलिस्टमध्ये संकटग्रस्त म्हणून सूचीबद्ध आहे.

n संवर्धन स्थिती:

असुरक्षित (पक्षी संख्या कमी होत आहे)

n वैज्ञानिक नाव:

Haliaeetus leucoryphus

n वस्तुमान: २.९ किलो

जीवनाचा विश्वकोश

n श्रेणी: प्रजाती

n उच्च वर्गीकरण: सागरी गरुड

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in