मीरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

मीरा-भाईंदरमध्ये १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर विनयभंग आणि बलात्कार केल्याच्या घटना अनुक्रमे उत्तन आणि काशिगाव पोलीस ठाणे हद्दीत घडल्या आहेत.
 मीरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
Published on

भाईंंदर : मीरा-भाईंदरमध्ये १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर विनयभंग आणि बलात्कार केल्याच्या घटना अनुक्रमे उत्तन आणि काशिगाव पोलीस ठाणे हद्दीत घडल्या आहेत. पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून दोघा आरोपींना अटक केली आहे.

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असल्याची संधी साधून अनस हुसेन शेख (१८) हा घरात शिरला. घरात शिरून त्याने मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी उत्तन पोलिसांनी शेखला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण बदादे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत मीरारोडच्या काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीला शेजारी राहणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीने फिरायला नेतो सांगून तिला एकविरा येथे नेऊन तसेच राहत्या घरी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक बंडू केसरे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in