पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने महिला-मुलींचे लैंगिक शोषण; सात जणांची टोळी अटकेत

पैशाचा पाऊस पाडून देतांना मांत्रिक बाबाच्या अंगात जीन येतो व त्यास विधीस बसलेल्या मुलीसोबत संभोग करण्याची इच्छा होते, असे...
पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने महिला-मुलींचे लैंगिक शोषण; सात जणांची टोळी अटकेत

ठाणे : पैशांचा पाऊस पाडून देतो अशी भूलथाप मारून महिला व मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीस ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. करोडो रुपयांचे आमिष दाखवून ही टोळी गरीब मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होती. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.

राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका पीडित मुलीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याचा तपास ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ कडे सोपवण्यात आला होता. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात असलम शम्मीउल्ला खान (५४), सलीम जखरुद्दीन शेख (४५) या दोघांना १७ फेब्रुवारी रोजी अटक केली तर या गुन्ह्यातला मुख्य मांत्रिक साहेबलाल वजीर शेख उर्फ युसूफ बाबा (६१) यास २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली. तसेच या टोळीत आणखी सदस्य सक्रिय असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तौसिफ शेख (३०), शबाना शेख (४५), शबीर शेख (५३) या तिघांना २९ फेब्रुवारी रोजी राबोडीतून, तर हितेंद्र शेट्टे (५६) यास १ मार्च रोजी बेड्या ठोकत गजाआड केले.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून या टोळीने अनेक महिला व मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. पैशाचा पाऊस पाडून देतांना मांत्रिक बाबाच्या अंगात जीन येतो व त्यास विधीस बसलेल्या मुलीसोबत संभोग करण्याची इच्छा होते, असे ही टोळी मुलींना पटवून देत होती. या टोळीने अशाच प्रकारे अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in