शहाड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला वेग; डांबर काढणी पूर्ण; पर्यायी मार्गाची दुरुस्तीही युद्धपातळीवर

शहाड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम आता अक्षरशः 'स्पीड मोड'वर आले असून, केवळ तीन दिवसांत जुन्या डांबराची पूर्ण काढणी करण्यात आली आहे. पुढील टप्प्यासाठी ब्रिजची साफसफाई आणि पृष्ठभाग तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, लेयरिंगचे काम लवकरच आरंभ होणार आहे.
शहाड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला वेग; डांबर काढणी पूर्ण; पर्यायी मार्गाची दुरुस्तीही युद्धपातळीवर
शहाड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला वेग; डांबर काढणी पूर्ण; पर्यायी मार्गाची दुरुस्तीही युद्धपातळीवर
Published on

उल्हासनगर : शहाड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम आता अक्षरशः 'स्पीड मोड'वर आले असून, केवळ तीन दिवसांत जुन्या डांबराची पूर्ण काढणी करण्यात आली आहे. पुढील टप्प्यासाठी ब्रिजची साफसफाई आणि पृष्ठभाग तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, लेयरिंगचे काम लवकरच आरंभ होणार आहे. दरम्यान, वाहतूककोंडीचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी मार्गाची दुरुस्तीही उल्हासनगर महापालिकेकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे.

शहाड ब्रिजवरील जुन्या डांबर काढण्याचे काम सलग तीन दिवस सुरू होते आणि आता ते पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यात ब्रिजवरील पृष्ठभाग तयार करून लेयरिंग सुरू करण्याचा मनपा व ठेकेदारांचा मानस आहे. हे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी आमदार कुमार आयलानी स्वतः रोजच्या पाहणीत सहभागी होत आहेत. त्यांच्या निर्देशानुसार ठेकेदाराने मनुष्यबळ वाढवले असून, एकूण सहा जेसीबी व अतिरिक्त कर्मचारी यांच्या मदतीने कामाचा वेग दुपटीने वाढवण्यात आला आहे.

रस्त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त साहित्य आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. पर्यायी मार्गावर काही ठिकाणी पाइपलाईन गळती आढळली आहे. जलपुरवठा विभाग या सर्व ठिकाणांची गळती प्राधान्याने बंद करत असून, त्यानंतर लगेचच त्या भागांचे खड्डे भरून रस्ता सुरळीत केला जाणार असल्याचे पालिकेमार्फत सांगण्यात आले आहे.

शहाड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला वेग; डांबर काढणी पूर्ण; पर्यायी मार्गाची दुरुस्तीही युद्धपातळीवर
शहाड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला वेग; डांबर काढणी पूर्ण; पर्यायी मार्गाची दुरुस्तीही युद्धपातळीवर

पर्यायी मार्ग दुरुस्तीला जोर

शहाड उड्डाणपूल बंद असल्याने ब्रिजखालील पर्यायी मार्गावर मोठा ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने या रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू केली आहे. कटकेश्वर मंदिर परिसरातून सुरू झालेल्या कामात ब्रिजखालील खोल खड्डे, स्मशानभूमी चौकापर्यंतचा दुभारणारा रस्ता, तसेच वाहनचालकांना अडथळा निर्माण करणारे उखडलेले भाग यांची दुरुस्ती वेगाने होत आहे.

नागरिकांना दिलासा मिळणार

शहाड ब्रिजवरील तसेच पर्यायी मार्गावरील काम ठरलेल्या वेळेत पूर्ण झाल्यास येथील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही स्तरांवर कामाला मिळालेला वेग पाहता, शहाड उड्डाणपूल नियोजित वेळेत वाहतुकीसाठी खुला होईल, अशी अपेक्षा वाढली आहे.

logo
marathi.freepressjournal.in