ठाणे : महासभेत झालेल्या गोंधळानंतर राष्ट्रगीताच्या अवमानाच्या आरोपावरून शिंदे सेनेने भाजप नगरसेवकांनी पूर्वनियोजित कट रचून महासभेत गोंधळ घातल्याचा आरोप केला असून, मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
महासभेपूर्वी ठाणे महानगरपालिका महापौरांच्या दालनात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वप्रथम लक्षवेधीवर चर्चा करणे, त्यानंतर विषयांवर निर्णय घेणे आणि शेवटी प्रश्नोत्तराचा तास घेणे असे सर्वानुमते ठरले होते, असा दावा शिंदे सेनेने केला आहे. सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी विषयांवर निर्णय घेण्याची विनंती केली होती, मात्र भाजप नगरसेवकांनी सभात्याग, घोषणाबाजी आणि महापौरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इतर पक्षांच्या सदस्यांनी लोकहिताचे विषय मंजूर केले.
राष्ट्रगीताचा अवमान भाजप नगरसेवकांनीच केला असून, त्यानंतर दिशाभूल करण्यासाठी मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांच्यावर आरोप करण्यात आले, आहे. भाजप नगरसेवकांनी महापौरांच्या दिशेने धाव घेतल्याच्या घटनेवर कारवाई करून संबंधित सदस्यांना निलंबित करण्याची मागणी मनोज शिंदे यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे.