शिवसेना आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाची 'त्या' कुटुंबियांना मदत ; शिवसेनेचे मानले आभार

या कक्षात १०० स्वयंसेवक यांची टीम तैनात करण्यात आलेली असून यामध्ये १० स्वयंसेवक हे पट्टीचे पोहणारे असून २२ स्वयंसेवक सेल्फ डिफेन्सचा अनुभव असलेले आहेत
शिवसेना आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाची 'त्या' कुटुंबियांना मदत ; शिवसेनेचे मानले आभार

डोंबिवली : कल्याण लोकसभेचे लोकप्रिय आणि संवेदनशील खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेच्या माध्यमातून डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाची स्थापन करण्यात आली. या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाची अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा गाडीचे उद्घाटन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. डोंबिवलीतील एका कुटुंबियांना या कक्षाची मदत मिळाल्याने त्यांनी शिवसेनेचे आभार मानले.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाने राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाने आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष वैभव राणे, शाखाप्रमुख (खंबाळपाडा ) वैभव राणे, उपविभाग प्रमुख ( नांदिवली ) अरविंद वत्रे, शहर सचिव संतोष चव्हाण

शिवसेना आपत्ती व्यवस्थापन विभाग डोंबिवली शहर हे सर्वसामान्य नागरिकांसाठी सहज उपलब्ध झाली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास पती, पत्नी व त्याचा चार वर्षांचा मुलगा हे सिटीस्कँनसाठी रिक्षाची वाट पाहत होते. मात्र रिक्षात थांबत नसल्याने त्यांना वेळेवर कसे पोहोचणार असा प्रश्न पडला. भरपावसात छत्री घेऊन पायी चालत असताना त्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाची गाडी पहिली. त्यांनी गाडीला हात दाखवुन थांबविले. राणे यांनी त्या कुटुंबियांना विचारले त्यांनी लवकर सिटीस्कनला यायचे असल्याचे सांगितले. त्यांची अडचण ऐकूण शिवसैनिकांनी त्या कुटुंबियांना गाडीत बसून सिटीस्कँन केंद्रापर्यत पोहोचविले. मदत केल्याबद्दल कुटुंबायांनी शिवसेनेचे आभार मानले.

या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाची अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा गाडीचे उद्घाटन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच या कक्षात काम करणाऱ्या स्वयंसेवकांना टी-शर्ट चे वाटपही करण्यात आले. या कक्षात १०० स्वयंसेवक यांची टीम तैनात करण्यात आलेली असून यामध्ये १० स्वयंसेवक हे पट्टीचे पोहणारे असून २२ स्वयंसेवक सेल्फ डिफेन्सचा अनुभव असलेले आहेत. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत कसे काम करावे याची माहिती असलेले स्वयंसेवक या कक्षात आहेत. त्या व्यतिरिक्त या स्वयंसेवकांना आपत्कालीन परिस्थितीत सातत्याने काम करत आलेल्या निपुण आणि चाणाक्ष अशा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in