भिवंडीत युवकाच्या हत्येप्रकरणी, शिवसेना उपशहरप्रमुखासह ७ जणांना अटक

पोलिसांनी अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
भिवंडीत युवकाच्या हत्येप्रकरणी, शिवसेना उपशहरप्रमुखासह ७ जणांना अटक

भिवंडी : भिवंडीतील युवकाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवसेना (शिंदे गट) उपशहरप्रमुख कैलास धोत्रे यांच्यासह अन्य २ आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर या खून प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता ७ झाली आहे. पोलिसांनी अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे मोठ्या संख्येने लोकांच्या उपस्थितीत मयत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. १४ फेब्रुवारी रोजी भिवंडी येथील बीएनएन महाविद्यालयासमोर दोन तरुणांमध्ये धक्काबुक्की करण्यावरून वाद झाला. त्यानंतर शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी संकेत भोसले (१७) याचे अपहरण करून त्यांना मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान जखमी तरुणाचा ७ दिवसांनी मृत्यू झाला. त्यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी १३ जणांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून लष्कर, दिनेश मोरे, चंदन गौर यांच्यासह ४ जणांना बुधवारी अटक केली आहे.

भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वपोनि महादेव कुंभार यांनी सांगितले की, या खून प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी शहर पोलिसांनी तयार केलेल्या पोलीस पथकाने मुख्य आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे, आकाश जाधव, विशाल साबळे याला रात्री उशिरा अटक केली. तर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ओम लोंढे याला अटक केली आहे. दरम्यान, खून करणाऱ्या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृत संकेत भोसले याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा स्थानिक नागरिकांसह कुटुंबीयांनी घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून या गुन्ह्यात एकूण सात गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर या गुन्ह्यातील आणखी काही फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in